जरांगे पाटलांच्या ६ व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात गोदाकाठच्या १२३ गावांना देणार मनोज जरांगे भेट

0
जरांगे पाटलांच्या ६ व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात

गोदाकाठच्या १२३ गावांना देणार मनोज जरांगे भेट

लोकाशा न्यूज विवेक कचरे

राजेगांव:- मनोज जरांगे पाटील यांच्या ६व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. गोदावरी काठच्या गावांचा दौरा मनोज जरांगे पाटील करणार आहेत.गोदाकाठच्या १२३ गावांना मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बहुतांश गावांचा यात समावेश असणार आहे.
123 गावांचा दौरा करण्याचे कारणही तसेच आहे‌ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेले आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे आता कष्ट करण्याचे दिवस आहेत त्यामुळे या आता गाव ना गाव पिंजून काढून मराठा समाजाच्या गाठीभेटी घ्यायच्या आहेत असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाचा आरक्षण आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आता शांततेत आंदोलन करायचं आहे आपण सर्वांनी नुसतं मुंबईमध्ये मांड्या घालून जरी बसलं तरी आता आरक्षण आपल्या पदरात पडणार आहे असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले.
   मराठा आरक्षणासाठी या 123 गावात सुरुवातीला उठाव केलेला आहे. या गावातील मराठा बांधवांना माझं भेटण झालं नाही म्हणून या १२३ गावांचा दौरा करत असल्याचे सांगण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रातील दौरा करण्यात आला परंतु जो आंदोलनाचा बेस (पाया) असलेल्या 123 गावांना त्यावेळी भेट देताना न आल्याची खंत मनात होती त्यामुळे दौरा सुरू केला असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीला शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आपेगाव येथून या 123 गावाच्या दौऱ्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.

चौकट:- जरांगे पाटलाच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्या टप्प्यातील 123 गावांच्या गाठीभेटीचा दौरा आपेगाव येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन सुरू केलेला आहे. या दौऱ्या दरम्यान आपेगाव येथील लहान मुले तरुण वर्ग तसेच वयोवृद्ध देखील या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने एकत्रित जमले होते.

चौकट:-  मनोज जरांगे पाटील यांचा गेवराई तालुक्यातील दौरा

दि.07 जानेवारी 2024
खामगांव: स.०८.०० वा. दर्शन सावळेश्वर, गंगावाड़ी, महा. पिंपळगांव, राक्षसभुवन : दुपारी जेवण
 पांचाळेश्वर, सुरळेगांव, गुळज मालेगांव, गा. जळगांव फाटा, उमापुर : रात्री ०१.०० वा. जेवण य मुक्काम

दि.०८ जानेवारी २०२४
घुमेगाव : स.०८.०० वा.
अर्धपिंप्री, चकलांबा, शेकटा, चं. पिपंळा,खळेगाव: दपारी जेवण
माटेगांव,कोमलवाडी फाटा, राजपिंप्री, गव्हारेपिंप्री,पांढरवाडी,धोंडराई
• अंतरवाली सराटी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)