मराठे आक्रमक शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या गाड्या आडवल्या

0
मराठे आक्रमक

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या गाड्या आडवल्या

माजलगांव तालुक्यातील प्रकारराजेगांव:- परळी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जाण्या येण्यासाठी शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत बस पाठवण्यात आल्या होत्या परंतु माजलगांव तालुक्यातील राजेगांव, रिधोरी, शेलगांव सह तालुक्यातील बऱ्याच गावातील मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला मराठा समाजातील कोणीही जाणार नाही. त्यामुळे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी घेण्यासाठी आलेल्या बस मराठा समाजाच्या तरुणांनी रिकाम्याच वापस पाठवल्या.
   शासनाच्या विरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देखील घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मराठा आंदोलकांनी आलेल्या बस ला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाहीत, जाहीर निषेध जाहीर निषेध महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध अश्या प्रकारच्या घोषणाबाजी करत आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)