प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवणारी मराठ्यांची रेकॉर्ड ब्रेक महासभा...

0
प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवणारी मराठ्यांची रेकॉर्ड ब्रेक महासभा...

22 ऑक्टोंबर पर्यंत दिला जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेट...

एक तर आरक्षणाची विजययात्रा निघेल नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल

तीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा..
 

राजेगांव:- जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठ्यांची महासभा आज संपन्न झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होता की प्रस्थापितांच्या उरात नक्कीच धडकी भरल्याशिवाय राहणार नाही अशी मराठ्यांची विराट महासभा सराटी अंतरवाली येथे झाली.
  मराठा समाजाची वेदना सांगण्यासाठी आजची (शनिवार) सभा होती. आम्हाला दहा दिवसांत आरक्षण द्या. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सभेतून सरकारला दिला. याचबरोबर केंद्रातील मोदी आणि शहा सर्व केंद्रीय तथा राज्यातील मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जर प्रयत्न केले तर दिल्लीपर्यंत त्यांच्यावर गुलाल उधळीत मराठा समाज जाईल अशी ग्वाही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
  या सभेतून बोलताना अन्न व पुरवठा मंत्री व गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकवून टीका केली असून या दोघांनाही देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच आवर घालावी अन्यथा मराठा समाजा कडून काही उद्रेक झाला तर त्याला मराठा समाज जबाबदार राहणार नाही त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची असेल असेही यावेळी बोलताना सांगितले.
  सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अन्यथा  22 ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. यापुढील आंदोलन देखील शांततेच्या मार्गानेच केली जातील. कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा उद्रेक जाळपोळ काहीही करायचे नाही. पुढील आंदोलन देखील आपल्याला शांततेच्या मार्गानेच करायची आहेत असेही मराठा समाजाला उद्देशून सांगितले. सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देण्यास कमी पडले तर भविष्यात महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनेला सर्वस्व राज्य सरकार जबाबदार असेल असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठ्यांच्या या महासभेची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली.



चौकट:- 
सभेच्या स्टेजवर मनोज जरांगे पाटील हे आल्यानंतर स्टेजवर लावलेला मंडप काढण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की माझा समाज जर आरक्षणासाठी भर उन्हात बसला असेल तर मला ह्या मंडपची गरज काय. हा मंडप अधिकार असे ठणकावून सांगितले परंतु समाजाने मंडप काढू नका असे खालून आवाज दिल्याने संयोजकाने मंडप काढण्यास नकार दिल्याने ते स्वतः उन्हात उभा राहून पूर्णवेळ बोलले.


चौकट:- ३० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा...

मराठ्यांच्या महासभेस मराठ्यांनो प्रंचड गर्दी केल्यामुळे चोहोबाजूंनी वाहनाच्या रांगात रांगा होत्या. तीस तीस किलोमीटर लांब वाहन लावून मराठा समाज सभास्थळी दाखल झाला होता.

चौकट:- भुजबळांनी गोर गरिबांचं रक्त पिवुन पैस कमावला

अंतरवाली सराटी याठिकाणी विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि सभे करता सात कोटी रूपये कुठून आले याला प्रतिउत्तर देताना पाटील यांनी भर सभेत सभेचा एकुण खर्च किती झाला व कुनी दिले हे सांगुन छगन भुजबळाला म्हणाले कि गरीबांचे रक्त पिवुन पैसे कमववायचे धंदे हे तुम्हीच करू शकतात.

चौकट:- देवेंद्र फडणविस यांनी माणसे अंगावर घालु नये
महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मराठा समाजाच्या अंगावर माणसं घालु नये जर या सर्व घटनेतुन मराठा समाज उसळला तर या घडणाऱ्या उद्रेकाला आपण व आपले सरकार जबाबदार राहीले असे सांगितले.

चौकट:- मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मागण्या व मुद्दे

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा 

 कोपर्डीतील ताई वर झालेल्या बलात्कारांना फाशी द्यावी

मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या ४५ बांधवांच्या घरच्यांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी

दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या प्रवर्गाचा सर्व्हे करावा आणि सर्व्हे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.

सारथी मध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे

महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. एनटी, व्हिजेएनटी प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.

चौकट:- सभेतील महत्वाचे क्षणचित्रे

 * महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा.

*समिती ने पुरावे गोळा करत बसू नये...

* मराठा समाज एक होत नाही असे म्हणणाऱ्यांच्या 
मुस्कटात मराठा समाजाने एकत्र होत मारली आहे.

*केंद्रातील व राज्यातील मंत्री मंडळाला हात जोडुन विनंती आहे की मराठा समाजाला कायद्याने टिकणारे आरक्षण लवकरात लवकर द्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)