राजेगांव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात किर्तन सप्ताहाचे आयोजन

0
राजेगांव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात किर्तन सप्ताहाचे आयोजन

    साखळी उपोषणाचा ३० वा दिवस


लोकाशा न्यूज विवेक कचरे

राजेगांव:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांच्या गाठी भेटी सुरू आहेत. या गाठी भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातील मराठा समाज जागोजागी मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहे. तसेच संपूर्ण मराठा समाजाचा मनोज जरांगे पाठिंबा असल्याचेही त्यांना गाठी भेटीदरम्यान सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मागील तीस दिवसांपासून माजलगाव तालुक्यातील राजेगांव येथे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. साखळी उपोषण सुरू करून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. याच साखळी उपोषणा दरम्यान अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राजेगाव येथील मराठा समाजातील तरुण मित्रांनी दि. ०३.१०.२०२३ ते ११.१०.२०२३ या दरम्यान किर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या किर्तन सप्ताहात पहिल्या दिवशी श्री. ह.भ.प.कल्याण महाराज देवडकर, दुसऱ्या दिवशी श्री.ह.भ.प.डिगांबर महाराज नखाते, तिसऱ्या दिवशी श्री. ह.भ.प.परमेश्वर महाराज कुरे, चौथ्या दिवशी श्री.ह.भ.प.श्रीराम महाराज शेळके, पाचव्या दिवशी श्री.ह.भ.प.सोपान महाराज (काका) इंगळे सहाव्या दिवशी श्री.ह.भ‌.प. पांडुरंग महाराज उगले, सातव्या दिवशी श्री.ह.भ.प.सिताराम महाराज रोडगे, आठव्या दिवशी श्री.ह.भ.प.गोपाल महाराज थोटे, नवव्या दिवशी श्री.ह.भ.प.राजेंद्र महाराज किनीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)