राजेगांव येथील साखळी उपोषण सुरूच

0
राजेगांव येथील साखळी उपोषण सुरुच...

आजचा ६ वा दिवस...

राजेगांव:- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला माजलगाव तालुक्यातील राजेगांव येथील मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दर्शवित  गुरुवार दि ५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गावातील हनुमान मंदिर परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे.

मनोज जरांगे पाटील हे यांच्या समानार्थ हे साखळी उपोषण सुरू असल्याचे राजेगांव येथील मराठा समाज बांधवांनी यांनी म्हटले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. उपोषण स्थळी गावा सह परिसरातील समाज बांधव व महिला मंडळ येऊन आपला पाठिंबा दर्शवत आहे. या उपोषणाची पूर्ण कल्पना आम्ही शासनाला अधिकृत पणे दिली आहे आता माघार नाही असे ही यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)