मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजेगाव येथे साखळी उपोषण

0
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजेगाव येथे साखळी उपोषण

मतदानावर ही टाकणारं बहिष्कार...


लोकाशा न्यूज विवेक कचरे

राजेगांव:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषण करीत आहेत. त्याचबरोबर आता माजलगाव तालुक्यातील राजेगांव येथे साखळी उपोषणाला काल पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आरक्षणासाठीचा लढा हळूहळू पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करीत आहे. परंतु, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे व अंतरवाली येथील अंदोलकांनावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच या आंदोलकावर झालेल्या लाटे चार चा तीव्र निषेध केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाने आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी आता अनेक ठिकाणी उपोषण केले जात आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर देखील बहिष्कार टाकणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काल माजलगाव तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत सकाळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. साखळी उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी मराठा बांधवांनी तहसीलदार मनाळे मॅडम, बाफना मॅडम तसेच पोलीस प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)