मराठा आरक्षणासाठी राजेगांव येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम

0
मराठा आरक्षणासाठी राजेगांव येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम..
मराठ्यांनी घातला सरकारच्या नावाने जागरण गोंधळ...

"ढोलकीला बांधील तुझे पाय पाय पाय आरक्षण दिल्याशिवाय सोडणार नाय" या गाण्यांनी वेधले लक्ष



राजेगांव:- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मागील दहा ते बारा दिवसापासून सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून माजलगाव तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी दिनांक 5 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणा बरोबरच राजेगाव येथील मराठा तरुणांनी सरकारच्या नावाने शनिवारी रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम घातला होता.
   आपल्या समाजामध्ये देवाला मनवण्यासाठी किंवा देवाकडून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी देवाचा जागरण गोंधळ घातला जातो. व हव्या असलेल्या गोष्टीची देवाकडे मागणी करून प्रार्थना केली जाते. त्याचप्रमाणे राजेगाव येथील मराठा तरुणांनी सरकारच्या नावाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम घालत आपल्या आराधी गाण्यातून सरकारकडे मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली आहे. "ढोलकीला बांधील तुझे पाय पाय पाय आरक्षण दिल्याशिवाय सोडणार नाय" अशा प्रकारच्या अनेक गाण्याने जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाने लक्ष वेधले होते. 
   मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी मराठा हे प्रमाणपत्र मिळत नाही या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत राजेगांव येथील साखळी उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्त्या मराठा बांधवांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)