रिधोरी येथे जोडे मारो आंदोलन व सरकारची अंत यात्रा काढत केला निषेध व्यक्त
राजेगांव :- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सराटी
अंतरवाली या गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या युवकांना पोलिसांनी, लाठीहल्ला करत अश्रूधुरांच्या नळकांड्यां फोडल्यामुळे मराठा समाज संतप्त झाला असून, त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा समाजाकडून बंद ठेवून त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच त्याचे परिणाम ग्रामीण भागातही उमटत आहेत.
माजलगाव तालुक्यातील रिधोरी या गावामध्ये मराठा समाज बांधवांनी हनुमान चौक या ठिकाणी सरकारचा निषेध करून जोडे मारो आंदोलन व अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला.
गावातील मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येत या अंत्ययात्रेचे आयोजन केले होते. या अंत्ययात्रेत सरकारविरोधी जोरदार भाषणे व घोषणाबाजी केली. तसेच या आंदोलनात सहभाग नोंदवला. या आंदोलनाला सर्वच समाजातील बांधवांनी आपले समर्थन दर्शवले.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.