शेतकऱ्याच्या पोरांनी छोटे मोठे उद्योग धंदे उभारावेत
गणेश फरताडे
तपेश्वर अर्बन बॅकेेची आर्थिक व्यवसायात यशस्वी वाटचाल :- विजयसिह पंडीत
लोकाशा न्यूज विवेक कचरे
राजेगांव:- टाकरवण येथील तपेश्वर अर्बन बॅकेचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी विजयसिह पंडीत, प्रमुख व्यक्ते गणेश फरताडे, प्रमुख पाहुणे संतोष भंडारी, महेश मुठाळ, चंद्रकात राऊत विश्वंभर येवले ,सिए गिरी सर यांच्या सह अधी मान्यवर व टाकरवण सह परिसरातील नागरिक तसेच बॅकेचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे महेश मुठाळ बोलताना म्हणाले बॅकेने ग्राहकाची पत ओळखुन कर्ज वाटप करने अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर ठेव ठेवीत असताना ग्राहकाचा विश्वास संपादन करून घेणे देखील आती महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी तपेश्वर अर्बन बँकेने जपल्या मुळे आर्थिक व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत आहे. तर प्रमुख व्यक्ते असलेले गणेश फरताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज घडीला शेतकऱ्याच्या पोरांनी छोटे मोठे उद्योग उभारणे अत्यंत गरजेचे आहे. आज एका शेतकऱ्याच्या पोरानी अर्थात शैलेष तौर यांनी उद्योग उभारून आर्थिक क्षेत्रात उडी घेत तपेश्वर अर्बन बॅकेची स्थापना करीत तीन वर्षात यशस्वी वाटचाल केली असुन शेतकऱ्याच्या पोरानी आदर्श घेण्या सारखे आहे. तरी शेतकऱ्याच्या पोरानी शेती बरोबर उद्योग व्यवसायाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विजयसिंह पंडीत बोलताना म्हणाले की कमी कालावधीत तपेश्वर अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत ग्राहक व खातेदाराचा विश्वास संपादन केला असुन या विश्वासाला तडा न जावु देता आशीच आर्थिक व्यवहार वाटचाल करीत राहावी. तपेश्वर अर्बन बॅक ही एक शिवछत्र परिवारातील सदस्य आहे. आणि ती कधी ग्राहक व खातेदाराच्या विश्वासाला तडा जावु देणार नाही हा माझा विश्वास आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश कानडे यांनी केले तर आभार हनुमान शेरे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्या करता तपेश्वर अर्बन बॅकेच्या सर्व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.