पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते
लोकाशा न्यूज विवेक कचरे
राजेगांव:- भारतातील एकमेव असे मानले जाणारे भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी या ठिकाणी आहे. भगवान पुरुषोत्तमाचे अधिक मासात अधिक महत्त्व असल्याने देशभरासह अनेक राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी पुरुषोत्तम पुरी या ठिकाणी येत असतात. अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तम ची मोठी यात्रा भरलेली आहे. अधिक मासाची समाप्ती अवघ्या काही दिवसावर आली असल्याने भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
गोदावरी नदीकाठी भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. गोदावरीच्या एका बाजूला माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी हे गाव आहे तर दुसऱ्या बाजूला जालना जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गोळेगाव हे गाव आहे. या गोळेगावच्या नदीपात्रातून होडीच्या साह्याने जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकही ये जा करत असतात. दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी ९/१० वाजण्याच्या सुमारास मारुती खवल वय वर्ष ४५ रा. माव पाटोदा ता. परतुर जि.जालना नावाचा भाविक आपल्या कुटुंबासह पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी गोळेगाव मार्गे आला असता, आपल्या पत्नीला होळीत बसवून पत्नी जवळ आपल्या अंगावरील कपडे देऊन गोदावरी नदीतून पोहत भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येतो असं म्हणून नदीतून पोहत निघाला होता. काही मिनिटात होडी पुरुषोत्तम पुरीच्या किनारी पोचली परंतु पोहोच निघालेला मारुती खवल पाण्यात कुठे दिसायला झाल्याने पत्नीने आरडा ओरड केली. त्यामुळे तीतील उपस्थित असणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना मारुती खवल पाण्यात बुडाल्याची कल्पना आली व नंतर शोध कार्य सुरू करण्यात आले. शोध कार्य सुरू होऊन आठ तासाचा कालावधी लोटला आहे तरी अद्याप देखील मारुती खवल यांचा मृतदेह मिळून आला नाही.
पुरुषोत्तम पुरी येथील स्थानिक भोई समाजाच्या बांधवांनी सकाळपासून शर्तीचे प्रयत्न केले. परंतु मारुती खवल चा मृतदेह सापडत नसल्याचे भोई समाजाच्या बांधवाकडून सांगण्यात आले. मारुती खवल बुडालेल्या जागी भवरा चक्र असल्याचे भोई समाजातील बांधवाकडून सांगण्यात आले. तसेच खाली पाण्यात दगडाच्या कपारी असल्याचे देखील सांगण्यात आले. भोई समाजाच्या बांधवांना यश येत नसल्याने एन डी आर एफ चे जवान देखील बोलण्यात आले होते परंतु त्यांनाही यश येत नसल्याचे दिसून आले.
चौकट:- यावेळी माजलगाव तहसीलच्या तहसीलदार वर्षा मनाळे, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय खटकळ, डीवायएसपी श्रेता खाडे,आष्टी पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ नरके हे देखील तळ ठोकून होते.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.