34 तासांच्या नंतर गोदावरीत बुडालेल्या भाविकांचा मृतदेह सापडला

0
34 तासांच्या नंतर गोदावरीत बुडालेल्या भाविकांचा मृतदेह सापडला

भगवान पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी येत होता भाविक


राजेगांव:- अधिक मास सुरू असल्याने भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी गोदावरी नदीतून पोहोत येणारा माव पाटोदा तालुका परतुर जिल्हा जालना येथील भाविक काल गोदावरी नदीच्या पात्रातील पाण्यात बुडाला होता. दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ दहा च्या दरम्यान बुडाला भाविक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सातच्या दरम्यान सापडला.

  घटना झालेल्या वेळेपासून अग्निशामक दल माजलगाव तसेच गावातील भोई समाजाचे बांधव पाण्यात बुडलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते परंतु त्यांना सारखे अपयश येत होते. 34 तासाच्या परिश्रमानंतर मृत मारुती खवलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नारळ गोळा करणाऱ्या मुलांना दिसला. त्यानंतर त्याचा मृतदेह काढून पुढील कारवाईसाठी परतुर कडे रवाना केल्याचे समजले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)