हालाखीच्या परिस्थितीवर मात करून सामान्य घरातील तरुण झाला फौजदार....

0
हालाखीच्या परिस्थितीवर मात करून सामान्य घरातील तरुण झाला फौजदार....

वाघोरा गावातून पहिला फौजदार होण्याचा मान विजय लोंढे नी मिळवला....

राजेगांव:- माजलगांव तालुक्यातील वाघोरा येथील अत्यंत साधारण कुटूंबातील विजय कोंडीबा लोंढे या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळविले आहे. वाघोरा गावातून फौजदार होणारा हा पहिलाच तरूण आहे. लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला असून यात बीड जिल्ह्याने मोठ्या प्रमाणावर बाजी मारली आहे.
    जिल्ह्यातील तब्बल ३० उमेदवार या परिक्षेत यशस्वी झाले आहेत. माजलगाव तालुक्यातील वाघोरा या खेडे गावातील विजय कोंडीबा लोंढे या तरूणाने अनुसूचित जाती प्रवर्गातून पोलिस उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण केली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करून विजय लोंढे यांनी हे यश संपादन केल्याबद्दल गावकऱ्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करून त्यांचा सत्कार केला. यावेळी  ओमप्रकाश शेटे साहेब, शिवाजीभाऊ रांजवन, बंडू भाऊ खांडेकर ,संजय लोंढे, बाळासाहेब लोंढे, राजेभाऊ लोंढे, कोंडीबा लोंढे(वडील) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विजयने मिळविलेल्या यशाबद्दल परिसरात एकच जल्लोष करण्यात येत आहे. विजय लोंढे यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)