कोणता झेंडा घेऊ हाती,
कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला संभ्रम....
पुढाऱ्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्ते सैरभैर...
राजकारणात वाटेल तेव्हा अचानक बदल होत आहेत, कोणता पुढारी कुणासोबत हेच नागरिकांना कळेनासे झाले आहे, त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. कुणाचा झेंडा हाती घ्यायचा कुणाचे पोस्टर लावायचे कोणत्या नेत्यासोबत जायचे असा विचार सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे, एका वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. परवाच्या या राजकीय भूकंपामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला दोघांचेही मुख्य कारण एकच सत्तेत सहभागी होणे. राजकारणात कधी काहीही होत असल्याने शिवसेना फुटून एक वर्ष झाल्यानंतरही आजही शिंदे व ठाकरे गटातील पुढारी गट एक होतील या आशेवर आहेत, शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही आनंद साजरा करण्यात आला नाही. आता तर राष्ट्रवादीही सोबत आली आहे कालपर्यंत एकमेकांवर चिकलफेक करून आरोपांच्या फैरी व खालच्या स्तरावर आरोप करणारे आता मांडीला मांडी लावून बसणार आहेत, त्यामुळे सध्या राजकारणच अस्थीर स्वरूपाचे झाले आहे, कोणता पुढारी कुणासोबत हेच कळेनासे झाल्याने कार्यकर्ते गोंधळात पडून सैरभैर झाले आहे. आता कुणाचा झेंडा हातात घ्यायचा असा विचार कार्यकर्त्यांना सतावत आहे.
चौकट:-
बहुपक्षीय सरकार
एका पक्षाची सत्ता होती त्यावेळी कार्यकर्त्याचा पुढारी एकच होता त्यासाठी तळमळीने काम केल्या जायचे त्यांच्याच वाढदिवशी बॅनर पोस्टर्स लावले जायचे त्यावेळी वेगळे वातावरण होते. आता मात्र कमालीची खिचडी झाली आहे आता एका पोस्टर व बॅनर्समध्ये सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांचे फोटो लावावे लागत आहेत त्यामुळे कार्यकर्त्याला एकाच कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही गटांना राजी करावे लागत आहे. काम असेल तर कोणत्या पुढार्याकडे जावे असा संभ्रम कार्यकर्त्यामध्ये आहे. परवाच्या झालेला राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.
चौकट:-
अनाकलनीय राजकारण
कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाच्या पुढार्या विरोधात आंदोलन करायचा आज तोच पक्ष सत्तेत सहकारी झाला आहे त्यामुळे कालपर्यंत सडकून टीका करणाऱ्या पुढार्यासोबत तोंड बंद करून राहावे लागत आहे. मुर्दाबाद करतानाच आता समर्थनार्थ जिंदाबादचे नारे ही लावावे लागणार आहे. राजकारणात कुणीही कायमस्वरूपी शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो असे म्हटले जाते. राष्ट्रवादी कालपर्यंत भाजप शिंदे गटा विरोधात रस्त्यावर आंदोलन करीत होते. आता त्यांना मात्र आपसूकच भाजप नेत्यांचे समर्थन करावे लागेल असे चित्र आहे. काँग्रेसमध्ये सध्या तरी गुडगुड सुरू आहे त्यांना आता रान मोकळे आहे एकंदरीत राजकारणातील या अनाकलनीय बदलामुळे व राजकीय स्वार्थामुळे कार्यकर्ते मात्र हवालदिल होत आहे.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.