तिर्थक्षेञ पुरूषोत्तमपुरी शासनाच्या निधीतून विलोभनिय पुरूषोत्तमपुरी करावी - भाविकांची मागणी

0
तिर्थक्षेञ पुरूषोत्तमपुरी शासनाच्या निधीतून विलोभनिय पुरूषोत्तमपुरी करावी - भाविकांची मागणी               

सावरगांव ते पुरूषोत्तमपुरी, सुर्डी नं. ते पुरुषोत्तपरी रस्त्याची दयनीय अवस्था पण प्रशासन मात्र शांत
राजेगांव:-मराठवाड्यातील बीड जिल्हा असलेल्या माजलगांव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी,  या गावास तिर्थक्षेञाचा दर्जा मिळताच शासनाने भरघोस असा निधी मिळून दोन वर्षे उलटली परंतु पुरूषोत्तमपुरी या गावचा विकास माञ झालाच नाही असे दिसते. अधिक  महिन्याची देवता भगवान पुरूषोत्तम भारतात कुठेही नाही म्हणून भाविक लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात, येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी शासनाने ५४ कोटी ५६ लाख रूपयेचा निधी दिला त्यामध्ये सुरूवातीला या तिर्थक्षेञास जाण्यासाठी चार रस्त्याची दोन पदरी व्यवस्था व मजबूतीकरण करण्यासाठी विशेष निधीची भर टाकली असली तरी या रस्त्याच्या देखभालीकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसते, तिर्थक्षेञ पुरूषोत्तमपुरी कडे सर्वात जवळचा मार्ग म्हणजे  माजलगांव गेवराई २२२ हायवे वर सावरगांव पासून पुरूषोत्तमपुरी १० की.मी वर आहे. परंतु ह्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, तसेच बागपिंपळगाव वरुन येणारा सुर्डी नजीक- राजेगांव मार्गे पुरुषोत्तमपुरी या रस्त्याची देखील दयनीय अवस्था आहे. त्यातच अधिक महिना हा पावसाळ्यात आल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरी स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे अशी भाविकांची मागणी आहे, तसेच गोदावरी नदीकाठी मोठा आणि प्रशस्त असा घाट बांधने बंधन कारकच आहे .  भाविक गोदावरी नदीकाठी स्नान करतांना माती , चिखलातूनच जावे लागते त्या वेळी पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून शासनाने नदीघाट त्वरित बांधण्यास चालू करावा, नदीघाट साठी विशेष निधीची पण व्यवस्था केली परंतु याकडेही दुर्लक्ष असल्याचे दिसते, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाविक ज्या वाहनांनी येतील ते वाहन उभे कुठे करायचे त्यासाठी पार्कींगची व्यवस्था होणे गरजेचेच आहे. या महत्त्वाच्या तीन गरजा बाजूला ठेवत शासन, प्रशासन आणि मंदिर कमेटीने याकडे माञ दुर्लक्ष करत भगवान पुरूषोत्तम मंदिर आणि सहा लक्षेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी मंदिर पाडण्यासाठी चालू केले आहे. त्याचा परिणाम माञ भाविकांना हाल अपेष्ठा भोगत देव दर्शन घ्यावे लागते. रस्ता दुरूस्ती , नदीकाठी घाट , आणि वाहनतळतरी पुढील येणाऱ्या अधिक मासात करावे अशी भाविक भगवान पुरूषोत्तमाचे दर्शन घेतांना  मागणी करतांना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)