अतिवृष्टीच्या अनुदान वाटपाचे घोडे अडलयं कुठं

0
अतिवृष्टीच्या अनुदान वाटपाचे घोडे अडलयं कुठं

अनुदानाच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित


लोकाशा न्यूज विवेक कचरे

राजेगांव:- मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. मागच्या सरकारने दिलेल्या मदतीच्या रक्कमेत डबल वाढ करण्याचे व क्षेत्र मर्यादा तीन हेक्टर करण्याचे शिंदे  सरकारने जाहीर केले होते. परंतु शिंदे सरकार कडून शेतकऱ्यांना छदाम देखील मिळालेला नाही. शिंदे सरकारचे अवतान म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. लबाडाचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही. म्हणतात ते खरचं असल्याचा प्रत्यय येत आहे.

    अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून इतके कोठे आले तितके कोठे आले असे वारंवार सांगते ते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक छदाम देखील आलेला नाही. सध्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची अंतर मशागतीचे कामे व खत बियाण्याचे दिवस असल्याने अनुदानाची रक्कम येण्याची वाट शेतकरी पाहत आहे. परंतु अनुदानाची रक्कम कधी मिळणार याकडे सध्या शेतकरीचे लक्ष लागले आहे. अनुदानाच्या बाबत कोणीच बोलायला तयार नसल्याने शेतकऱ्यांना देखील अनुदानाचा रकमेवर संभ्रम निर्माण झाला आहे. अनुदानाबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता अनुदानाचा चेक बँकाकडे वर्ग केल्याची कळते परंतु बँका वाल्यांकडून चेक न आल्याचे देखील समजते. या सर्व प्रकारावरून अनुदानाची घोडे अडले कुठे हेच कळला मार्ग नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)