जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते पुरुषोत्तमाची शासकिय महापुजा संपन्न

0
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते पुरुषोत्तमाची शासकिय महापुजा संपन्न 


आज पासुन अधिकमासाला सुरुवात 

पहिल्याच दिवसी वीस हजार भाविकांनी घेतले दर्शन
लोकाशा न्यूज विवेक कचरे

राजेगांव :- माजलगांव तालुक्यातील गोदावरीच्या काठी असलेल्या तसेच संपूर्ण भारतातील एकमेव पुरूषोत्तमाचे मंदिर असलेले पुरुषोत्तमपुरी या ठिकाणीच्या पुरुषोत्तमाच्या अधिकमासाच्या ( धोंड्याच्या ) यात्रे निमित्त पहिल्या दिवशी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांच्या हस्ते शासकीय पूजा पूर्णपणे विधीवंत प्रकारे पार पडली. या शासकीय महापूजा वेळी प्रज्ञा माने गटअधिकारी, वर्षा मनाळे तहसीलदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे, तसेच पोलीस प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
    आज पासुन अधिकमासाला ( धोंड्याच्या महिन्याला) सुरूवात झाली असुन देशातील एकमेव देवस्थान असलेल्या पुरूषोत्तमुरी याठिकाणी पुरूषोत्तमाच्या यात्रेस सुरूवात झाली आहे. अनेक राज्यातुन या अधिकमासात दर्शनासाठी भाविक भक्त याठिकाणी येतात. आज अधिकमासाचा पहिला दिवस असल्यामुळे याठिकाणी महापुजा करण्यात आले. या वर्षीची ही महापुजा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली. पूजा झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी मंदीर परिसराची पाहणी केली. त्याच बरोबर डॉ. साबळे यांनी याठिकाणी आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देण्यात येतील असे सांगितले. 
  पहिल्याच दिवशी वीस हजार भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे मंदिर ट्रस्टची व प्रशासनाची प्रारंभी तारांबळ उडाली होती. परंतु मंदिर ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी दर्शनासाठी रांगा लावून भाविकांना दर्शन सुरळीत करून दिले. मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विजय गोळेकर, उपाध्यक्ष दिगंबर कोरडे, बाबासाहेब गोळेकर, माजी सरपंच भाऊसाहेब गोळेकर यांच्या सह ग्रामस्थांनी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

चौकट:- 
शेड मध्येच घ्यावे लागणार दर्शन

पुरुषोत्तमाच्या मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम सुरू असल्याने येणाऱ्या भाविकांना अधिक मासात मंदिराऐवजी शेडमध्येच भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन मिळणार आहे. पुरुषोत्तमच्या मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून 90 बाय 70 या आकाराचे शेड उभारले आहे.
विजय गोळेकर
अध्यक्ष पुरुषोत्तम मंदिर

चौकट:-
दर्शनासाठी मंदिर 24 तास असणार उघडे
  भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी एकच वेळी गर्दी करू नये असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात येत आहे. पुरुषोत्तमाचे दर्शन भाविकांना 24 तास घेता येणार आहे. भाविकांसाठी मंदिर 24 तास उघडे असल्याचे देखील मंदिर समितीचे अध्यक्ष विजय गोळेकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)