रशियातून एमबीबीएस पदवी घेत नावलौकिक केल्याने सुमित तौरचे गौरव

0
तपेश्वर अर्बन कडुन सुमित तौर यांचा सत्कार

एमबीबीएस पदाची रशियात मिळवली पदवी


राजेगांव:- टाकरवण पासुन अवघ्या पाच किमी अंतरावर गोदावरीच्या काठावर असलेल्या ढालेगांव येथील शेतकरी चंद्रकांत तौर यांच्या मुलाला रशिया याठिकाणी एमबीबीएस डॉक्टरची पदवी प्रदान करण्यात आली‌. या मुळे टाकरवण येथील तपेश्वर अर्बन बॅके कडून चंद्रकात तौर यांचा मुलगा सुमित तौर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

   गोदावरीच्या काठावर असलेले ढालेगांव याठिकाणी मोठ्या संख्येने तेथील नागरिक प्रमुख्याने शेती हाच व्यवसाय करतात. आजोबा व वडीलानी शेतीच केली आपण ही शेती करावी ही मानसिकता ठेवून मुले ही शेती कडे वळतात पण या गांवचा पंचकृषीतील नागरिकांनी आदर्श घ्यावा अशी ओळख येथील तरूणाई करून देत आहे. कारण ज्या संख्येने गांवात प्रमुख्याने नागरीक शेती करतात तितक्याच संख्येने येथील तरूण विविध क्षेत्रात आई वडीलांसह गांवाचे नाव लैकीक करत आहेत.

  नुकतीच रशिया या ठिकाणी सुमीत तौर यांना एमबीबीएस डॉक्टर पदाची पदवी प्रदान करण्यात आली. यामुळे त्याचे ढालेगांव करांच्या वतीने कौतुक करण्यात येत होते. परंतु याचा आदर्श हा सर्व पंचकृषीतील शेतकऱ्यांच्या मुलानी घ्यावा. या करता टाकरवण येथील तपेश्वर अर्बन कडून सुमित तौर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बॅकेचे चेअरमन शैलेष तौर, बॅकेचे सिईओ दादासाहेब तौर यांच्या सह सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)