माजलगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

0

माजलगाव तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

माजलगाव तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुली शेतामध्ये बकऱ्या चारणाऱ्यासाठी गेलेल्या असता तिघा जणांनी दोन दिवस अत्याचार केल्याने पीडितेच्या फिर्यादीवरून मंगळवारी तिघा जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   तालुक्यातील दोन अल्पवयीन पिडित मुली शेतात अकरा साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारणाऱ्यासाठी गेल्या असता. मोटरसायकवर तिघे जण शेळ्या चारणाऱ्यासाठी गेलेल्या जागी आले व त्यातील दोघा जणांनी या दोघींना बळजबरीने उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी अकरा वाजता दोन मुली पैकी एका पीडितेला वरील आरोपींपैकी एका मुलीला धमकावून तिसऱ्या एका जनासोबत संबंध ठेवण्यासाठी धमकावत बळजबरीने अत्याचार केला. आणि या पुढेही असाच प्रकार होत राहील या भितीने हे प्रकरण पिडित मुली ने आपल्या आज्जीला सांगितले व आज्जीने हे प्रकरण घरातील कर्त्या पुरुषाला सांगून माजलगाव ग्रामीण पोलीस गाठून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तिन आरोपी विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आज (दि.१३) मंगळवारी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीनही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)