'महाडीबीटी' पोर्टलवरील होणारी सोडत बंद होणार; असा सोशल मीडियावरील मेसेज चुकीचा
कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची स्पष्टीकरण
कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ 'महाडीबीटी' या वेबसाईट पोर्टल वरील अर्जाची सोडत १५ मे नंतर होणार नसल्याचा, संदेश गेल्या आठ दिवसांपासून सोशल माध्यमातून फिरत आहे. मात्र ही माहिती खोटी आणि जाणीवपुर्वक पणाने प्रसारित केली जात आहे. असा कुठल्याही प्रकारचा आदेश आयुक्तालय अथवा शासकीय स्तरावरून देण्यात आलेला नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेती संबंधित वस्तूंचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाने 'महाडीबीटी' या वेबसाईट वर अर्ज नोंदणी सुरू ठेवावी असे आवाहन कृषी विभागाने
शेतीसाठी लागणाऱ्या विविध शेती संबंधित वस्तू व अवजारांचा तसेच शेततळी व अन्य विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी 'महाडीबीटी' ह्या वेबसाईट पोर्टल विकसित केलेल आहे. एकच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ मिळवण्याची सुविधा शासन स्तरावरून या वेबसाईट पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. साधरण अर्जाची संख्या चांगल्या प्रमाणात झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत सोडत काढून शेतकरी वर्गाला योजनेचा लाभ दिला जातो. सोडत मध्ये शेतकऱ्याचे नाव निश्चित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला थेट मोबाईल वर संदेश पाठवून आपली निवड होऊन लाभार्थी असल्याचे सांगितले जाते. या पध्दत प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणे सोपे झाल आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून महा डिबीटी वरील योजनांच्या लाभासाठी तातडीने अर्ज करावेत, कारण 15 मे पासून महाडीबीटी या पोर्टलवर कसलेही प्रकारची सोडत होणार नाही, असा मेसेज समाज सोशल मीडियावर फिरत आहे. या संदेशामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होऊन चिंता वाढली होती. मात्र कृषी आयुक्तालय विभाग अथवा राज्य शासनस्तावरुन असे कुठलाही आदेश देण्यात आलेले नाही, त्यामुळे हा संदेश जाणीवपुर्वक पणाने टाकले जात आहेत. शेतकरी मित्रांनी असल्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. अशा चुकीच्या व खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवता शेतकरी वर्गाने कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करणे सुरू ठेवाव, असे आवाहनही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.