Cotton Rate : कापूस भाववाढीची आशा मावळली

0

आज घडीला ६००० ते ६४०० ₹ प्रति क्विंटल चा भाव


राजेगांव : २०२१ च्या खरीप हंगामात कापसाला विक्रमी ११ ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही तोच दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
२०२२ मध्ये कापूस शेतकऱ्यांचा घरात आला, सुरूवातीला प्रतिक्विंटल ९ ते ९ हजार ५०० रुपये दर मिळाला. 
मागील वर्षीप्रमाणे यंदाही कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र मे महिना संपत आला तरीही कापसाचे दर काही वाढले नाही, उलट आता कापूस थेट ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.
कापूस आणि सोयाबीन हे खरिपाचे मुख्य पिकं आहेत. गेल्या खरिपात अवेळी झालेल्या पावसाने सोयाबिन, कपाशी आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र निसर्गाच्या या कचाट्यातून शेतकऱ्यांनी कसेबसे पिकं वाचवून घरात आणले. त्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांचा समावेश होता. मात्र यावर्षी सोयाबीन आणि कापस दोन्ही पिकांना समाधानकारक भाव नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)