बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती तलवडा येथील बीट अंमलदार मुकेश गुंजाळ यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती देवून शुक्रवारी दि.12 मे 2023 रोजी दुपारच्या सुमारास शेतात छापा मारला, असता त्यावेळी 25 ते 30 छोटी-मोठी गाजांची झाडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.
तलवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात महामार्गा पासून आत मध्ये 4 ते 5 किमी अंतरावर एका रानात गांजाची शेती करण्यात आली होती. त्या गांज्याच्या शेती विषयी माहिती तलवाडा पोलीसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या शेतात छापा मारला असता 25 ते 30 लहान मोठे गांजाची झाडे दिसून आली. त्या गाज्यांच्या झाडांची किंमत अंदाजित दोन लाखाच्या जवळपास असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु ही शेती कुणाची आहे? याचा अद्याप समजू शकले नाही. पोलीस शेतमालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक स्वप्नील राठोड, तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, आदींच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे आढळली गांज्याची शेती
मे १२, २०२३
0
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.