सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करताना काळजी घ्या
अन्यथा होणार गुन्हा दाखल
सोशल मीडियावर द्वेषमूलक बाब प्रसारीत करणे भोवले
माजलगावात एकावर गुन्हा दाखल
माजलगाव येथील अतिक्रमण हटाव मोहिमेचे फोटो आणि माहिती प्रसारीत करुन या मोहिमेस हिंदू राष्ट्राची सुरुवात, बुलडोझर राज असे नामाभिमान देऊन, संबोधन देऊन दोन समाजात दरी निर्माण होईल असे शब्द प्रसारीत केल्या प्रकरणी येथील शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील नवनाथनगर भागातील भारत तुकाराम बोडखे याने आणि इतर काही लोकांनी सोशल मीडिया वरून माजलगाव येथील अतिक्रमण हटाव मोहिमेचे फोटो आणि माहिती प्रसारीत केली. या पोस्टमुळे जातीय द्वेष निर्माण होण्याची संभावना पाहता या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.
पोलिस सोशल मिडिया वर लक्ष ठेऊन आहे आणि जो कोणी कोणत्याही खात्रीशीर माहिती शिवाय द्वेषमूलक काही प्रसारीत करेल तर त्याचे विरुध्द कडक कायदेशीर उपाययोजना करण्यास पोलिस कटिबध्द आहे.
पंकज कुमावत, सहाय्यक पोलिस अधीक्षक
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.