नवरा बायकोचा संशयास्पद मृत्यू 'पत्नी’चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत ‘पती’लटकलेल्या अवस्थेत आढळला

0
बीड तालुक्यातील नालवंडी येथे घडलेली घटना.

बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुशीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे या गावातील पती-पत्नीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नालवंडी येथे घडली आहे. त्यांच्या राहत्या घरातील एका खोलीत पत्नी मृतावस्थेत आढळून आली, तर पती दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना ३ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली असून मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पतीने स्वत:चा जीव घेण्यापूर्वी पत्नीची हत्या केली असावी, अशी अफवा पसरली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास भारती सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)