पत्रकारांच्या मागण्यांसाठी द व्हॉईस ऑफ मीडियातर्फे गुरुवारी माजलगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाभरातील इतर उपविभागीय व तहसील कार्यालयातही होणाऱ्या या आंदोलनात सर्व पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवावा. माजलगाव तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी ही घोषणा केली आहे.
मीडिया हा लोकशाही समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण माध्यमकर्मी (पत्रकार) च्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. सरकारने पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून निधी उपलब्ध करून द्यावा, ५० वर्षे काम केलेल्या पत्रकारांना मान्यता द्यावी, वृत्तपत्रांवरील जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी सरकारी भूखंड उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या समूहातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. कोविड-19 मुळे मरण पावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाइन वर्करचा दर्जा द्या आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार द्या. माजलगाव तहसील कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात येणार असून, जास्तीत जास्त पत्रकारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आव्हान व्हॉईस ऑफ मीडिया करत आहे.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.