सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक परेशान

0
सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक परेशान

राजेगांव येथील तरुण करणार महावितरणच्या विरोधात आंदोलन युवा नेते गणेश बादाडे यांची माहिती


राजेगांव:- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून महावितरणाकडून सतत वीज खंडित केली जात आहे. व वीज कमी दाबाने देखील दिली जात आहे. वीज कमी दाबाने दिल्यामुळे विजे वरील कुठलेच उपकरण चालत नाहीत. तसेच सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक परेशान झाले आहेत. आधीच उन्हाचा पारा वाढल्याने सर्वसामान्य नागरिक गर्मीमुळे लाही लाही होत आहेत.  त्यामुळे महावितरणाने राजेगाव सह परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरणाच्या दारात राजेगाव येथील तरुणाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणेश बादाडे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)