जिल्ह्यत वाळूमाफियांचा नंगा नाच

0
जिल्ह्यत वाळूमाफियांचा नंगा नाच
महसूल, पोलीस प्रशासन कोमात, वाळूमाफिया जोमात, माजलगाव तालुका आघाडीवर

कवडगांवथडी, रिधोरी, शेलगांवथडी येथून दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू

जिल्हाधिकारी मॅडम याकडे लक्ष देणार का...?

महसूल विभागाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष 

राजेगांव:-माजलगांव तालुक्यातील गोदापट्यात गत अनेक  महिन्यांपासून वाळू उपसा करून दिवसा ढवळ्या अवैध वाळू उपसा करून  विक्री केली जात आहे. तर उपसा करताना कारवाई झाली तरीही काही होत नसते असा ठाम विश्वास वाळुमाफिया सर्वसामान्य जनते पुढे व्यक्त करतात.
मागील काही दिवसांपासून दिवसाढवळ्या गोदावरी पात्रात जेसीबी व ट्रॅक्टर च्या साह्याने वाळू माफिया वाळूची चोरी करताना आढळून येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती परंतु कारवाई झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच वाळू माफिया वाळू उपसा सुरू केला आहे. 
सध्या कवडगांवथडी, रिधोरी, शेलगांवथडी,गव्हाणथडी आदी गोदापट्यातून वाळूची चोरी दिवसा केली जाते. याविषयी लहान मोठ्या संबधित अधिकाऱ्यांना देखील माहीत असूनही  हप्ते घेतले जात असल्यामुळे कार्यवाही  करण्यास धजावत नसल्याचे सर्वसामान्य जनतेतुन बोलले जात आहे.

हे नक्की वाचा : राज्यातील नागरिकांना स्वस्थ दराने रेती मिळणार

वाळु माफियांचे अधिकारी कर्मचाऱ्या सोबत साटेलोटे

गत अनेक वर्षा पासुन गोदापट्यातुन कधी जेसीबी तर कधी केन्याच्या सहाय्याने माफिया राजरोज पणे वाळुचा उपसा करत आहेत परंतु त्याच्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांकडुन कुठलीच ठोस कार्यवाही केली जात नसुन त्याच्या सोबत हप्ते देऊन साटेलोटे असल्याचे गोदापट्यातील सर्वसामान्य नागरीकांनी नाव छापण्याच्या  अटीवर प्रतिक्रीया दिल्या.



कायदेशीररित्या वाळु उपसा सुरू होणे गरजेचे
सध्या वाळुमाफिया कडुन गोदापात्रातुन वाळुचा उपसा केला जात असुन चढ्याभावाने वाळुची विक्री केले जात आहे. शासनाची ६०० रूपये ब्रास वाळू सुरू होणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)