धोंडू पाटील यांचे संपर्क प्रमुख पदही काढून घेतले
उध्दव ठाकरे यांची घोषणा
बीड जिल्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची आज दि.१९ /०५/२०२३ शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर टडकाफटकी हकालपट्टी करण्याची घोषणा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे तसेच शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांचे संपर्क प्रमुख पद देखील काढून घेण्यात आलेले आहे.
काल झालेल्या सुषमा अंधारे व आप्पासाहेब जाधव यांच्या तील बाचाबाची व धक्काबुक्की मुळे आप्पासाहेब जाधव यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख पद काढून घेऊन हकालपट्टी करण्यात आले असल्याचे समजते. सुषमा अंधारे व आप्पासाहेब जाधव यांच्या प्रकरणानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी आप्पासाहेब जाधव यांच्या गाडीची तोडफोड करत धक्काबुक्की केल्या मुळे देखील पद काढल्याचे समजते.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.