गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेचा शुभारंभ

0

काल दि. ११ मे रोजी माजलगाव तालुक्यातील मंगळरु नं.१ येथे गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचे उ्घाटन बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते पार पडले. ही योजना सेवाभावी संस्था यांच्या सहभागातून असून त्यास लोकसहभागाचा आधार आहे. यामुळे यंत्रणा उभी करणे सुलभ झाले. गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजने तून शेतकरी आपल्या शेतात काळी माती मोफत नेऊ शकतात. तसेच यावर मृदू जल संधारण धोरणा नुसार शेतकऱ्याना अनुदान देण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले आहे. तसेच आज जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पहिल्यांदाच माजलगाव तालुक्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी उपविभागीय कार्यालयास भेट देऊन येथील उपविभागीय कार्यालयाचा लेखा जोखा घेतला. व त्यांनी विभागीय अधिकारी यांच्याशी अनेक विषयावर चर्चा करत त्यांनी समाधान व्यक्त केले.

x

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)