तहसीलदार मन्नाळेंना दिले विविध मागण्यांचे निवेदन
पत्रकारांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज "व्हाइस ऑफ मीडिया" या संघटनेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. बीडमध्ये व्हाइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार वर्षा मन्नाळे यांना दिले. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, पत्रकारितेत ५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना मान्यतापत्रे द्यावी, वृत्तपत्रांवरील जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी सरकारी भूखंड द्यावा, मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, छोटय़ा-छोटय़ांना समान जाहिरातीची संधी द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे. दैनिके आणि साप्ताहिके आणि कोविड-19 मध्ये प्राण गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाइन वर्करचा दर्जा देणे. या धरणे आंदोलनाला अनेक पत्रकार व माध्यमांचे उपाध्यक्ष उपस्थित होते.
बीड जिल्हा उपाध्यक्ष संतोष स्वामी, माजलगाव तालुका अध्यक्ष वैजनाथ घायतीडक, कार्याध्यक्ष राजेभाऊ पाष्टे,तालुका उपाध्यक्ष नागेश वकरे,संघटक ज्ञानोबा कटारे, तालुका उपाध्यक्ष विवेक कचरे, सय्यद जावेद, पुरूषोत्तम करवा, दत्ता येवले, ज्योतीराम पांढरपोटे, शिवनाथ जाधव, महादेव कदम हनुमान शेरे, बबलू माने,दिनेश गरड, वैजनाथ डहाळे,अनंत घडसिंगे,डिगांबर शिंदे,उमेश जेथलीया, रविंद्र राऊत, दत्ता येवले, विशाल थावरे, बालासाहेब उकांडे,सुभाष बोराडे, स्वामी सुदर्शन,वाजेद पठाण,टेंभूणे परमेश्वर यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.