2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा ‘आरबीआय’चा निर्णय

0
2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा ‘आरबीआय’चा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. २ हजारांच्या नोटा चलनातून बंद केल्या आहेत. आपल्याकडं असलेल्या २ हजारांच्या नोटा २३ मे ते ३० सप्टेंबर पर्यंत बॅंकेत जमा करता येणार आहेत. एका वेळी एका खात्यावर २० हजार रुपये जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु २ हजार रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत २ हजाार रुपयांच्या नोटा मार्केट मधून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियााने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत असे ही आरबीआयने स्पष्ट केले आहे . आरबीआयने २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)