दहावी-बारावी ऑफलाईन परीक्षेच्या तारखा जाहीर. शाळा तिथे परीक्षा केंद्र .

 पुणे, ता. ३ : राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित पद्धतीने ऑफलाइनच होणार असून, विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचलित ऑफलाइन परीक्षेत मंडळाच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाही दहा मिनिटे आधी देण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. 

लसीचे बंधन नाही 

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. आताही विद्यार्थ्यांच्या लसांकरणासाठी पुरेसा अवधी आहे. पालकांनी लसीकरण पूर्ण करून व्यावे. मात्र, परीक्षेला बसण्यासाठी लसीकरणाचे बंधन कोणाला करता येत नाही, असे गोसावी यांनी सांगितले. आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही विद्यार्थी आजारी पडला किंवा अपरिहार्य कारणामुळे परीक्षेत सहभागी होऊ शकला नाही. तर अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेत संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणारा नाही, असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षांच्या तारखा


दहावी :

● प्रात्यक्षिक :

२५ फेब्रुवारी ते १४ मार्च


● लेखी :

 १५ मार्च ते ४ एप्रिलबारावी :

● प्रात्यक्षिक :

१४ फेब्रुवारी ते ३ मार्च 


● लेखी: 

४ मार्च ते ३० मार्च

ठळक बाबी


● दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार


● ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी अतिरिक्त १५ मिनिटे


● ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी अतिरिक्त ३० मिनिटे


● विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र येईल, अशी व्यवस्था बोर्ड करणार 


● विद्यार्थी संख्या अधिक असेल तर शाळेच्या जवळचेच परीक्षा केंद्र.\


● एका शाळेत १५ पेक्षा जास्त परीक्षार्थी असतील तर तिथे परीक्षा केंद्र करणार


● गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्यात येणारटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या