बिटकॉइन, इथेरियम आणि नॉन फंगिबल टोकन (एनएफटी) आदींना कधीही कायदेशीर मान्यता मिळणार नाही. नवी दिल्ली, ता. २  बिटकॉइन इथेरियम आणि नॉन फंगिबल टोकन (एनएफटी) आदींना कधीही कायदेशीर मान्यता मिळणार नाही, येऊ घातलेल्या नव्या डिजिटल करन्सीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. (आरबीआय) मान्यता असल्याने ते कधी बादही होणार नाही असे वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांनी सांगितले. तत्पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये व्हर्म्युअल डिजिटल संपत्तीवर तीस टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. त्यामुळे डिजिटल करन्सीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता.

"क्रिप्टोकरन्सीचे मूल्य हे दोन लोकांकडून निश्चित करण्यात येते, तुम्ही सोने आणि हिरे यांच्याप्रमाणेच क्रिप्टोची देखील खरेदी करू शकता पंण त्याच्या मूल्याला सरकारची मान्यता नसेल." असेही सोमनाथन यांनी नमूद केले. ते म्हणाले की, " डिजिटल अॅसेटमध्ये गुंतवणूक करताना लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांची यातील गुंतवणूक यशस्वी होईल किंवा नाही याची हमी सरकार देत नाही. एखाद्या व्यक्तीला त्यात तोटा झाला तर त्याची जबाबदारी सरकार घेणार नाही." असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या