दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच, अफवांवर विश्वास ठेवू नयेः शिक्षण मंडळाचे आवाहनपुणे, ता. २ :
दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अथवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. धारावीत झालेल्या घमासान आंदोलनानंतर परीक्षेबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात बुधवारी (ता.दोन) शिक्षण मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बोडनि केले आहे.

    कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या. यंदा देखील परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन, असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाला आहे. मात्र, यंदाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने बहुतेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. उर्वरित अभ्यासक्रम १५-२० दिवसांत शंभर टक्के शिकवून पूर्ण होईल. त्यामुळे विद्याथ्र्यांनी हिंदुस्थानी भाई' सारख्या व्यक्तींवर विश्वास न ठेवता परीक्षेची तयारी करावी, असे आवाहनही बोडनि केले आहे. 

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षेसाठी केंद्राची चाचपणीदेखील केली आहे. यावर्षी औरंगाबाद विभागीय मंडळातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ केंद्रे; तर बारावीसाठी ४०८ केंद्र निश्चित केले आहेत. यंदा दहावीसाठी १ लाख ८१ हजार ६०२; तर बारावीसाठी १ लाख ६५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आवेदन पत्र भरले आहेत. यावर्षी दहावी आणि बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.


बोर्डाची परीक्षेसाठीची तयारी

समुपदेशकांची नियुक्ती 

• हेल्पलाइन नंबरची सुविधा

• ११ फेब्रुवारीला प्रात्यक्षिक परीक्षा साहित्यांचे वितरण

• केंद्रावरील सुविधांची पाहणी 

• जिल्हानिहाय केंद्र संचालकांची. ऑनलाइन मीटिंग घेणार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या