भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव, भारत-वेस्ट इंडिज मालिकेवर संकटाचे ढग.

 


अहमदाबाद, ता. २ : भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड व नवदीप सैनी यांच्यासह काही सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाली आहे. याच कारणामुळे टीम इंडियाचा संपूर्ण संघ विलगीकरणात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज मालिकेवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.

    भारत वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन एकदिवसीय व तीन टी-२० लढती खेळवण्यात येणार आहेत. अहमदाबादमध्ये एकदिवसीय; तर कोलकता येथे टी-२० क्रिकेट मालिका होणार आहे. भारतीय संघ रविवारी अहमदाबादला पोहोचला होता. त्यानंतर कोरोना नियमाअंतर्गत सर्वांचीच कोरोना चाचणी घेण्यात आली.

    पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता; पण दुसऱ्या चाचणीचा भारतीय खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयकडून खेळाडूंच्या नावांची यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली; ज्यात श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड व नवदीप सैनी या खेळाडूंना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. या मध्ये काही सहाय्यक प्रशिक्षकांचा पण समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या