Olympic and Paralympic Heroes :
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंनी 26 जानेवारीपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (IISM) चा हा उपक्रम आहे, ज्यामध्ये या सर्व खेळाडू आणि पॅराऍथलीट्ससह एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताचे राष्ट्रगीत दाखवण्यात आले आहे. IISM ने 26 जानेवारीपूर्वी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रगीताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांमध्ये खेळाविषयी जागरुकता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.
या खेळाडूंनी गायले राष्ट्रगीत:
नीरज चोप्रा रवी कुमार दहिया मीराबाई चानू पीआर श्रीजेश लवलिना बोरोघन सुमीत अंतील मनीष नरवाल प्रमोद भगत कृष्णा नगर भावना पटेल निषाद कुमार योगेश कथुनिया देवेंद्र झाझरिया प्रवीण कुमार या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले सुहास यथीराज शरद कुमार हरविंदर सिंग आणि मनोक सरकार यांनीही राष्ट्रगीत गायले आहे. या सर्वांनी टोकियो येथे झालेल्या या खेळांमध्ये भारताचे नावे ऐतिहासिक कामगिरी केली.
व्हिडीओ पाहा
0 टिप्पण्या