कातरिनानं शेअर केले मालदीव मधील सुंदर फोटो; नेटकर्यांनी विचारला प्रश्न.

Katrina Kaif, Vicky Kaushal : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. कतरिना आणि विक हे दोघेही सोशल मीडिया वर नेहमी सक्रिय असतात तसेची एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो नेहमी शेअर करतात. नुकताच कतरिनानं तिचे मालदीवमधील फोटो शेअर केले. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. कतरिनाने तिचा मालदीवमधील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'माय हॅप्पी प्लेस'. या फोटोमध्ये कतरिना डार्क ग्रीन कलरचा शर्ट आणि व्हाईट प्रिंटेड शॉर्ट्स अशा लूकमध्ये दिसत आहे. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हनिमूनच्या फोटोमध्ये विकी कुठंय? ' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'क्विन ऑफ मिलियन हार्ट्स' राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले होते. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर खान, मिनी माथूर, गुरदास मान आणि शर्वरी वाघ या सारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कतरिना लवकरच 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' या तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या