बिपीन रावत, प्रभा अत्रे, चंद्रशेखरन यांना 'पद्मभूषण' घोषित; सोनू निगम, राजवंशी सुलोचना चव्हाण, डॉ. बावस्कर यांचाही होणार गौरव

 नवी दिल्ली, ता. २५ :  नागरी क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्म सन्मानांची आज घोषणा झाली असून पहिले सरसेनाध्यक्ष झालेले दिवंगत जनरल बिपिन रावत, गीताप्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राहिलेले दिवंगत राधेश्याम खेमका, माजी राज्यपाल तसेच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना मरणोत्तर तर प्रख्यात गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. यासोबतच कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण तर, विंचवाच्या दंशावर लस शोधणारे डॉ. हिंमतराव बावस्कर, प्रख्यात कलावंत सुलोचना चव्हाण, दिवंगत आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले आहे. चार, उत्तराखंडमधील चार, मणीपूरमधील तीन, तर गोव्यातील दोन पद्म सन्मानार्थीचा यादीत समावेश कार्यरत राहीन. आहे. यासोबतच परदेशात


  कला, साहित्य आणि शिक्षण, प्रशासकीय सेवा, समाजसेवा, उद्योग आणि व्यापार, क्रीडा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, औषधनिर्माण, पाककला, योग, अध्यात्म त्याचप्रमाणे कृषी, पशुपालन यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १२८ मान्यवरांना यंदाचे पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. यामध्ये चार पद्मविभूषण, १७ पद्मभूषण तर १०७ पद्मश्री असून त्यात महाराष्ट्रातील १० मान्यवरांचा समावेश आहे. तर विधानसभा निवडणूक होत असलेल्या उत्तर प्रदेशातील १३. पंजाबमधील चार, उत्तराखंडमधील चार, मणीपूरमधील तीन, तर गोव्यातील दोन पद्म सन्मानार्थीचा यादीत समावेश आहे. यासोबतच परदेशात असलेल्या भारतीय वंशाच्या तसेच भारताच्या प्रगतीत योगदान देणाऱ्यांनाही पद्म देऊन सन्मानित करण्यात आले असून यात अमेरिका, रशिया, आयलंड, थायलंड, जपान, ब्रिटन, पोलंड, मेक्सिको या देशांचा समावेश करण्यात आला आहे. 

होत सायरस पूनावाला यांचा सन्मान 

  कोरोना संसर्गाचा यशस्वी धित मुकाबला करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचे भारतीय उत्पादक सायरस पूनावाला यांनाही पद्म सन्मानाने गौरविण्यात आले आहे. व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना भारतीय बुद्धीमत्तेचा डंका जगभरात पोहोचविणारे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले सत्या नाडेला, 'गुगल'चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासह राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य, शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान, आदी १०७ जणांचा यंदाच्या सन्मानार्थीमध्ये पद्म समावेश आहे. 

महाराष्ट्रातील पद्म सन्मानार्थी

महाराष्ट्रातील डॉ. हिंमतराव बावस्कर, लावणी गायकीचा सोज्वळ चेहरा असलेल्या सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे, चित्रपट संगितातील प्रसिद्ध नाव असलेला गायक सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी, डॉ. भीमसेन सिंघल आणि श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) या सात जणांना पद्मश्री सन्मानाने गौरविले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या