कोरोना पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या महत्वाच्या सूचना नवी दिल्ली : कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही त्यामुळं सर्वांनी अद्याप यासंबंधिच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. यामध्ये त्यांनी देशाच्या आजवरच्या प्रवासावर भाष्य केलं.


राष्ट्रपती म्हणाले, मानव समुदयाला एकमेकांच्या सहकार्याची गरज यापूर्वी कधीही पडली नव्हती जितकी आज आहे. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण, मानवाचा कोरोना विषाणूशी संघर्ष अद्याप सुरुच आहे. या महामारीन हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे. जागतीक समुदयाला या अभुतपूर्व आपत्तीचा सामना करावा लागला आहे. नवनवी रुप धारण करत हा विषाणून नवीन संकट निर्माण करतो आहे.


महामारीचा सामना करणं भारतासाठी कठीण जाणं अपेक्षित होतं. आपल्या देशात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. तसेच विकसनशील अर्थव्यवस्था असल्यानं आपल्याजवळ या अदृश्य शत्रूसोबत लढण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच पुरेसे संसाधनं उपलब्ध नव्हते. परंतू अशा कठीण वेळेसच कोणत्याही राष्ट्राची संघर्ष करण्याची क्षमता उजळून निघते. पण मला सांगायला आनंद वाटतो की, आपण कोरोना विषाणूविरोधात दृढ संकल्पाचं प्रदर्शन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या