या पार्श्वभूमीवर महिला पोलिसांना ८ तास ड्युटी करण्यासाठी महिला आयोगाचा पाठिंबा हवा अशी मागणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केली आहे. मात्र हा बदल घडवण्यास आपण एकटे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी महिला आयोगानंही पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आमच्याकडे किती तरी महिला पोलीस आहेत त्यांना २४ तास ड्युटी आहे. पण अजून आम्ही महिलांना ८ तास ड्युटी करू शकलो नाही. राज्यात काही ठिकाणी महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी झाली आहे. पण अनेक ठिकाणी अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही.
महिला पोलीसांना ८ तास ड्युटी करण्यासाठी मला महिला आयोगाचा पाठिंबा पाहिजे. मी एकटा पडतोय अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली आहे.
मला नगरच्या एका महिला कॉन्स्टेबलचा फोन आला ती सांगत होती. साहेब चार दिवस मी ड्युटी करतेय, हा बदल करायला एक संजय पांडे पुरेसा नाही, महिला आयोगाने याचा पाठपुरावा करायला हवा असं संजय पांडे यांनी म्हटलं आहे.
महिलांसाठी शौचालयाची सुविधा नाही
नायगाव पोलीस स्टेशन आहे तिथे महिलांसाठी शोचालय नाही. पोलीस स्टेशनमध्ये किमान एक महिला शोचालय असायला हवं अशी मागणीही संजय पांडे यांनी केली आहे..
दुसरा एक विषय आहे एकत्रीकरणाचा नवरा सोलापूरमध्ये असतो तर पत्नी नागपूरात त्यांना आपण एका ठिकाणी ड्युटी देऊ शकत नाही. याकडेही संजय पांडे यांनी लक्ष वेधलं आहे.
0 टिप्पण्या