आज या कंपन्यांचे शेअर्स घसरले. सलग पाच दिवसांच्या पडझडीनंतर आज शेअर बाजार सावरता आहे.


मुंबई : शेअर बाजार सुरू होताच कोसळलेला शेअर बाजार हा मार्केट बंद होताना मात्र सावरल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 366.64 अंकांनी वधारला आहे तर निफ्टी ही 128.90 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 57.858.15 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.75 टक्क्यांची वाढ होऊन तो 17.278 वर पोहोचला आहे. सलग पाच दिवसांच्या पडझडीनंतर आज शेअर बाजार सावरता आहे.


सकाळी शेअर बाजार सुरू होताच काही मिनिटांमध्ये सेनसेक्स 800 हून अधिक अंकांनी कोसळला होता. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम देशातील शेअर बाजारावर दिसून आता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेअर बाजार काही प्रमाणात सावरत असल्याचे चित्र होते. त्यानंतर शेअर बाजार बंद होताना पुन्हा एकदा वधारल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.


आज 1935 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1330 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 84 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.


आज Maruti Suzuki, Axis Bank, SBI. IndusInd Bank आणि UPL कंपन्यांच्या

निफ्टीमध्ये वाढ झाली आहे तर Wipro Bajaj Finser. Titan Company, Infosys

आणि Tech Mahindra कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.


आज बाजार बंद होताना ऑटो, बँक, सार्वजनिक बँका, उर्जा, या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 2 ते 14 टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले


●  Maruti Suzuki- 6.83%

● Axis Bank- 6.76% • SBI 4.15%

●  Indusind Bank-3.88%

●  UPL- 3-74%या कंपन्यांचे शेअर्स घसरले


● Wipro- 1.75%

●  Bajaj Finserv- 1.13 %

●  Titan Company- 1.10 %

●  Infosys- 0.84 %

●  Tech Mahindra- 0.83

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या